Motivational Status – Marathi


मोटिवेशनल स्टेटस मराठी

एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं.

अशक्य हा शब्दच आपल्या
शब्दकोशातून काढून टाका.

इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी मनावर संयम ठेवणे,
शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.

अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.

विचार कराण्यासाठी वेळ द्या.
पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की
विचार करणे थाबंवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.

पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.

लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल
काय मत आहे हे महत्त्वाचे.

मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,
तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.

जीवनातील काही पराभव हे
विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.

अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.