|| धूप दीप झाला आता कर्पूर आरती, ….||


Interesting WhatsApp forward – Worth reading and learning.

कर्पूर आरतीचे अर्थानुसंधान

कर्पूरगौरं करुणावतारं
संसारसारं भुजगेन्द्रहारम्
सदा वसं तं हृदयारविन्दे
भवं भवानिसहितं नमामि ।

मन्दारमाला कुलतालकायै
कपालमालांकित शेखराय
दिव्याम्बरायै च दिगंबराय

नम: शिवायै च नम: शिवाय।।

मुख्य आरतीनंतर ‘कर्पूर आरती’ म्हणून म्हटल्या जाणा-या या आरतीचा कापूराशी काही संबंध नाही. केवळ सुरुवात ‘कर्पूर’ शब्दाने होते इतकेच.
हे शिवपार्वतीचे एक अतिशय सुरेख स्तवन आहे. अर्थानुसंधान ठेवले तर या स्तवनाने अधिक आनंद मिळतो.
१. कर्पूरगौरं : कापूराप्रमाणे शुभ्र, पवित्र असलेली गौरवर्णा (पार्वती,)
२. करुणावतारं : करुणेचा साक्षांत अवतार असलेले (शिव शंकर)
३. संसारसारं ( सार-असार सहित)
४. भुजगेन्द्रहारं : भुजंगाचा हार परिधान करणारे (शिव शंकर)
५. सदा वसं तं हृदयारविन्दे : तुम्ही माझ्या हृदयकमलात सदा निवास करावा (यासाठी)
६. भवं — शिवाला
७. भवानिसहितं – पार्वतीसह
८. नमामि– नमन करतो, वंदन करतो.
———-
९. मंदारमालाकुलतायकायै- मंदार पुष्पकलिकांच्या मालांनी सुशोभित (अशी) पार्वती, (आणि)
१०. कपालमालांकित शेखराय – नरमुंडमाला परिधान केलेले शिवशंकर
११. दिव्यांबरायै – दिव्य वस्त्र परिधान केलेली (पार्वती)
– च – आणि—
१२. दिगंबराय – दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे अशा शिव शंकरांना नमन करतो. नम: — नमन करतो
१३. शिवायै — पार्वती — च— आणि
१४ नम: शिवाय — शंकराला
(पार्वती आणि शिवशंकर यांना अभिवादन करतो.)

—- हे सुंदर स्तवन अनेकदा भरपूर अपभ्रंशांसह सरसकट म्हटले जाते. याचा अर्थ समजून घेणे नक्कीच आनंददायक आहे.

विश्वेश्वर भा सावदेकर, नागपूर