परप्रांतीय कामगारांची संख्या पाहिली का? via WhatsApp University. I liked. sharing.


परप्रांतीय कामगारांची संख्या पाहिली का?
एवढा रोजगार आहे आपल्या राज्यात… मग आपली टुकार-रिकामटेकडी टाळकी का मिळवत नाहीत हा रोजगार..?
मराठी तरुण उद्योगी केंव्हा होणार..?

👉 सगळे सूतार हे उत्तरभारतीय/ राजस्थानी आहेत. आणि सगळे चांगले कारागीरच आहेत. उत्तम फर्निचर बनवतात. दिवसभर मेहनत करतात.

सिंगल हजेरी म्हणजे सकाळी नऊ ते पाच – पाचशे रुपये.
आणि ड़बल हजेरी सकाळी नऊ ते रात्री अकरा म्हणजे दिवसभराची अधिकतम मजूरी एक हजार रुपये.

या सगळ्यांचा म्होरक्या जो आहे तो उत्तर भारतीय तरूण तिशीतला मुलगा. तो आपल्या गावातून उत्तम कारागीर शोधून आणतो. हे कारागीर तरुण असतात. मोठ्या कारागीरांच्या हाताखाली पंधरा सोळा तास राहतात, शिकतात आणि कौशल्य कमावतात. विनातक्रार दिवसभर काम करतात. सकाळी यांचा नास्ता म्हणजे भिजवलेले कच्चे चणे, दुपारी वरण भात आणि रात्री अकरा नंतर यांच्या मधील एक शिकाऊ मुलगा सगळ्यांचे जेवण बनवतो. ह्या उत्तर भारतीय तरूण म्होरक्याच्या हाताखाली निव्वळ गोरेगाव ते विरार या विभागात असे सत्तरेक कारागीर काम करतात… मन लावून काम करतात. कुठेही खळखळ दिसत नाही फारशी आणि बघता बघता उत्तम असे फर्निचर घरात आकार घेत जाते.

तेव्हा प्रश्न पडतो… मराठी सूतार गेले कुठे सगळे?

👉 समोरच्या गल्लीत दहा वर्षांपूर्वीपासून आत्ता आत्तापर्यंत एकच भाजीचे दुकान होते एवढ्या परिसरात. उत्तर भारतीय नवरा बायको आणि त्यांचे तीन मुलगे… सगळे भाजीच्या दुकानात राबत असत. दुकानात तोबा गर्दी दिवसभर. एका गाळ्यावर आज हळूहळू दोन गाळे, दोन फ्लॅट्स घेतले त्या कुटुंबाने! मेहनत सकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत सारे कुटुंब राबत असते.

तेव्हा मला प्रश्न पडतो… मराठी बेरोजगार तरुणांना हे धंदे का खुणावत नाहीत?

👉 कारण मेहनतीची तयारी नाही. हे रहस्य मला रिनोव्हेशनच्या वेळीच जाणवले. वायरींग करण्यासाठी आलेला इलेक्ट्रिशियन म्हणाला की, ‘मेहनत खूप आहे कन्सिल वायरिंग करण्यात. शिवाय कौशल्य ही आहेच पण हल्ली मराठी तरूण या कामात येतच नाहीत फारसे.’

मला प्रश्न पडला… मराठी तरूण गेले कुठे?

👉 माझ्या घरापासून ते स्टेशनपर्यंतच्या परिसरात फक्त एक किराणा दुकान मराठी माणसाचे आहे. बाकी सगळी दुकाने उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती लोकांची आहेत. आपल्या छोट्याशा दुकानात लागणारी चार पाच माणसे ते आपल्या गावाहून आपल्या समाजातली घेऊन येतात. आणि त्यांची संख्या इथे वाढत जाते. आणि त्यांची प्रगतीही होत राहते.

इकडे मला प्रश्न पडतो… मराठी तरूण काय करतो…?

👉 परिसरात इस्त्रीवाला मराठी नाही, दूधवाला, ब्रेडवाला मराठी नाही, पानवाला हजाम बाहेरचा. (ही वसई /विरार/ पालघरसारख्या मराठी बहुल विभागातील परिस्थिती!)

माझ्या ओळखीचा एक कोकणी तरुण आहे. तो मुंबईत सरकारी कार्यालयात शिपायाची नोकरी करतो. सुरुवातीला दहा पंधरा हजार पगार होता फक्त. आणि कोकणात त्याची हापूसची पस्तीस कलमं धूळ खात पडलीत म्हणे…चोरापोरापायी जातात. पण याला गावी जायला, तिथं राहायला आवडत नाही. मग अशा कोकणात उ. भारतीय लोक जाऊन तिथली कलमं भाडेपट्ट्यावर घेतात आणि त्यांची राखण करत आंब्याचा व्यवसाय वाढवतात.

अशा प्रकारच्या अनेक कारागिरांची, मेहनत कारणाऱ्यांची गरज असते… आहे आणि पुढेही लागणार आहे.
तेव्हा मराठी तरूण कुठे असतात? सगळ्याच जाती धर्माचे…?

👉 तर याचे मला भरपुर मंथन केल्यावर सापड़लेले उत्तर आहे की…
मराठी तरुण चळवळी, संघटना, आणि युनियन,क्रांती मोर्चा, ब्रिगेड बांधण्यात मशगूल असतात नको तेथे उसळतात. सार्वजनिक दहीहंडी, गणपती बसवण्यात मशगुल असतात. मिरवणुका काढण्यात मशगुल असतात. राजकारण्यांच्या हाताखाली कार्यकर्ते म्हणून नाचण्यात मशगूल असतात. शिवाजी राजे, टिळक, आंबेडकर, याबद्दलचे वाद घालण्यात मश्गूल असतात. नाचायचे, मारामारी, फोड़ाफोड़ी, दारू, तंबाखू आणि “मी कुठला धंदा करु याचा विचार” यातच दिवस काढ़तो

ठीक तर हे सगळं करायलाही कुणी तरी हवंच आहे नाही का ? पण मग परप्रांतियांच्या नावाने खडे फोडू नये. हजारो किमी दूर अनोळखी प्रदेशात येऊन, ते रिस्क घेतात, मेहनत करतात, पंधरा सोळा तास राब राब राबतात…

👉 माझ्या मराठी बंधूनो खरं सांगा… विचार करून सांगा आपल्याला… आपल्या तरूणांना आपल्याच गावात राहून ते करता येत नसेल तर हा दोष कुणाचा? मराठी माणसाचे अस्तित्व नक्कीच आहे, पण कुठे गल्ली बोळात टिंगल टवाळी करायला फक्त आपलेच असतात. गल्ली मध्ये दादागिरी भाईगिरी, गाड्या जाळायला, पोलिसांची डोकेदुखी वाढवायला आपलेच असतात.
वाढदिवसाला फ्लेक्स लावून भावी आमदार, खासदार नाहीच तर नगरसेवक लिहून नाहक खर्च करणारे आपलेच असतात! मोठं मोठ्या गाड्या घेऊन फुकट खर्च करायला आपलेच असतात!!सणावाराला दादागिरी करून वर्गणी जमा करायला आपलेच असतात!!! शाळा, कॉलेज, मध्ये तोढफोड करायला आपलेच असतात!!!!
कोण म्हणतं मराठी माणसाचा अस्तित्व नाही????????

बघा अजूनही वेळ गेली नाही.
विचार करा आणि आपलं अस्तित्व निर्माण करा. फक्त बार रेस्टोरंट मध्ये संध्याकाळी बसून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नाहक चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करून दाखवून द्या. नाहीतर एक दिवस आपल्याच एक एकरावर आपल्याला काम करायचे दिवस लांब नाहीत.

सर्व महाराष्ट्रीयन तरुणांना समर्पित.
उघडा डोळे वागा नीट…

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.