Madhura Parkhe’s article


निसर्ग ही देणगीच।रोज सकाळी मॅार्निग वॅाक साठी बाहेर पडते.रस्त्यात एक बहरलेला पारीजातक दिसतो.सर्वत्र सुगंध पसरला असतो.झाडाच्या भोवताली फुलांचा सडा पडला असतो.सकाळच्या प्रहरी हे सगळ फारच मोहीत करत ।खरच निसर्ग ही ईश्वरी देणगीच.।सकाळी सुर्याचे उगवणे, नंतर मावळणे,रात्रीचा चंद्र,लुकलुकत्या चादण्या,वारा, पाऊस,विविध रंगबेरंगी झाडफुलं,उसळणारऱ्या लाटा,बर्फाच्यादीत डोंगर।सगळेच अद्वीतीय,अप्रतीम।नारायणाच्या या सगळ्या विभुतीच.पावसाच्या धारांची जशी मोजदात करता येत नाही,तसेच या विभुतींची गिणती करता येत नाही. मानवानी या निसर्गाची जोपासना केली.ह्या निसर्ग प्रेमातुन विविध आविष्कार घडत गेले.भावनाविष्कार, कलाविष्कार असे पैलु पडत गेले.पारदर्शक अद्वितीयअनुपम सौंदर्याचा आविष्कार घडला आणी मनुष्य आपल्या भावना आवरु शकला नाही.एक आव्हानच मानवी मनाला मिळाले.उच्च कोटीचे साहित्याचे निर्मिती झाली. अनेक चित्रकार तयार झाले. निसर्गाच्या प्रेमात पडणारे बालकवी लिहतात , “आनंदी आनंद गडे,इकडे तिकडे चोहीकडे। वरती खाली मोद भरे,वायुसंगे मोद फिरे।सुर्याच्या उदय,अस्ता बरोबर बदलणारऱ्या आकाशाच्या छटा,रुतुनुसार बदलणारी सृष्टी हे सगळे जेव्हा चित्रीत केल्या जाते. त्यावेळेस रंगाचे मिश्रण करुन हुबेहुब छटा साकारणे हे चित्रकारासाठी आव्हानच असते.निसर्गाला मानवी मनानी आपले मानले.आपले मनोगत व्यक्त करायला तो जवळचा वाटला.वीर सावरकर अदंमानच्या जेलमध्ये असतांना आपली व्यथा ते सागराला सांगतात। “ने मजसी ने परत मातृभुमीला, सागरा प्राण तळमळला।अनेक बुध्दीवादी जाणकारानी झाडापासुन जडीबुटी तयार केल्या. औषधी वनस्पती उपयोगात येऊ लागल्या.निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एक एक आव्हान स्विकारत मनुष्य प्रगती करत गेला.निसर्गाचा आधार घेतला आणी संशोधन कार्यात दुय्यम दर्जाचे स्थान प्राप्त झाले.William Wordsworth सारखे कवी स्वत:च्या एकटेपणाची तुलना ढगांबरोबर करतात. ते म्हणतात,मी एकटा आहे ,आणी नाहीपण! कारण हा निसर्ग माझ्या बरोबर आहे. ते लिहतात,I wondered lonely as a cloudThat floats on high o’ er vales and hillsWhen all at ones I saw a crowdA host of golden deffodilsBeside the lake beneath the treesFluttering and dancing in the breeze।पुर्वी निसर्गाची पुजा करत.आजही सुर्याला अर्घ्य दिल्या जाते।सर्वानां परीचीत निसर्ग स्थळ आहेत.तिथे जाऊन मनसोक्त निसर्गाचा आस्वाद घेतां येतो.निसर्ग देवतेला शत:ष प्रणाम।मधुरा पारखे