Article by Madhura Parkhe


।श्री।।श्रीकृष्णार्जुन संवाद ….हे शीर्षक पाहील्यावर लक्षात येईल,हे ज्ञानप्रधान गीताशास्र.नुकतेच ज्ञानेश्वरीचे वाचेन केले.अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत असलेला ग्रंथ खुप आवडला. ज्ञानदेव माऊलींनी प्राकृत भाषेत असलेल्या गीताग्रंथाला देशी मायबोलीचा अलंकार चढवला.ग्रंथारंभी श्रीज्ञानदेवांनी श्रीव्यास व शंकराचार्य यांची थोरवी वर्णन करुन गुरुपरंपरा सांगितली.व त्यांचे गुरु निवृथीनाथ देवाच्या कृपासामर्थाने मला गीतेसारख्या असामान्य ग्रंथावर लिहण्याचे भाग्य लाभले,असे सांगुन कृतज्ञता व्यक्त केली.७०० श्लोकांचा,१२ अध्यायाचा ,असंख्य उदा.सहीत विस्तृत असा ग्रंथ आहे.अर्जुनाचे निमित्त करुन सांगीतलेल्या गीतामृताने जगाचा उध्दार झाला.श्रीमुखातुन निघालेले हे गीतामृत ज्ञानरुपी प्रकाशची वाटचाल करायला सहाय्यभूत ठरले.महाभारत युध्दात रणांगणावर विविध प्रकारच्या शंखाच्या निनादांनी आकाश पृथ्वी दणाणून गेले.अर्जुनानी आप्तस्वकीयांना पाहुन मीयुंध्य करु शकणार नाही,असे सांगुन शस्त्र खाली टाकले.आणी इथूनच गीताभाष्याला सुरवात झाली.मनानी खचलेल्या ,विचलीत मन:स्तिथीत असलेल्या अर्जुनाला स्थिरता देण्यासाठी विविध योगाचे स्पष्टीकरण देऊन अर्जुनाचे मनोबल वाढविले.भगवंत म्हणतात,हे पार्था तु क्षत्रीय आहेस.म्हणुन युध्यकर्म करणे हा तुझा धर्म. आहे.तुझे शौर्य श्रेष्ठ दर्जाचे आहे.म्हणुन हे शुद्र दुबळेपण सोडुन युध्यास तयार हो.तु आपले कर्म कर ,फळाची चिन्ता करु नकोस .आणी कर्म न करण्याचा आग्रह करु नकोस. स्वत: भगवंत ज्ञान ,सत्य,कर्म,भक्ती आणी शक्ती चे पुजारी आहेत.म्हणुनच त्यांनी गीताशास्त्रात कर्मकांड, उपासना कांड.ज्ञानकांड याचा विस्तृत असा उपदेश केला आहे. निष्काम कर्म करीत उपासना करायची ,आणी ज्ञान प्राप्त करायचे.हे अत्यन्त सोप्या उदा.सहीत सांगितले ज्ञानमार्गाचा अवलंब करण्यासांठी विविध अशा योगमार्गाचा अभ्यासक विचार अर्जुनासमोर मांडून उपदेश केलेला आहे.आपल्या शरीर ,वाचा ,मन यांच्यावर ताबा ठेऊन जे जे निष्काम कर्म उत्पन्न होइल ते ईश्वराच्या उद्देशाने करावे ,त्यालाच सर्मपण करावे.”निष्काम कर्म म्हणजे योग्य कर्माचे आचरण”।स्वत: भगवंत सुध्या विहीत कर्माचे आचरण करुन सृष्टीचा साभांळ करतात.सुर्याच्या प्रकाशात प्राणीमात्राचे सर्व व्यवहार होतात. पण सुर्य त्या कर्माने लिप्त हेात नाही.पार्था क्षत्रिय धर्मानुसार अहंकार रहित कर्म कर,रथावर आरुढ हो आणी युध्य कर। उपासना कांड यांत योगेशवर अर्जुनाला योग साधनेचा उपदेश करतात.इद्रीय निग्रह आणी मनोनिग्रह ही साधना करीत असतांना पुर्णवस्था प्राप्त होण्यापुर्वी आयुष्य संपले. तरी त्याला मोक्षाचीच गती प्राप्त होणार.एखादा प्रवासी सुर्यास्त झाल्यामुळे आपल्या ठीकाणी पोहचु शकत नाही.परंतु सुर्यदयानंतर तो तिथुनच पुढे आपल्या स्थानाकडे चालु लागतो.,त्याला मागे यावे लागत नाही. भगवंत म्हणतात,जेव्हा योगाचे नियमन केलेले चित्त आत्म स्वरुपामध्ये स्थिर होते.सर्व विषयान पासुन तृषाशुन्य होणे, त्याला योगसिध्द झाला म्हणता येते.कर्मफलाचा संकल्प ज्याला सुटला नाही ,असा मनुष्य योगी होत नाही.चंचल मनाचा निग्रह करणे अवघड।पण अभ्यासाने ,वैराग्याने हा निग्रह करता येतो.भगवंत म्हणतात,काही भोगाच्या इच्छेने भिन्न भिन्न देवतांची भक्ती करतात.त्यांना इच्छीत फळही मिळते.,ते सुध्या मीच देतो.ते माझे स्वाभाविक औदार्य आहे.दोऱ्यामध्ये मणी गुफांवे,तसे जग माझ्यामध्ये गुफंलेले आहे. सात्विक,राजस ,तामस हे विकार भगवंतानी निर्माण केले.तरी त्या पदार्थामध्ये ते नाहीत.अग्नीपासुन धुर उत्पन्न होतो पण धुरात अग्नी नसतो.सत्व रज तम या गुणांनी माझे आत्म स्वरुप झाकल्या गेले .म्हणुन प्राणी मला ओळखत नाही.मी आणी माझेपण या भ्रांतीने ते विषयांध होतात. पण जो माझी भक्ती करतो,तो सर्व कर्म पार करतो.माझा भक्त कधी नाश पावत नाही.भक्त चार प्रकारचे असतात.आर्त, जिज्ञासु,अर्थार्थी,ज्ञानी।चारही उत्कृष्ट असले तरी ज्ञानी भक्त माझा आत्मा आहे.म्हणुन हे पार्था ज्ञानाने माझे स्मरण कर.आणी माझ्याच स्वरुपाला प्राप्त हो.असे निश्चय पुर्वक सांगुन अर्जुनाच्या मनांत उठलेले विकल्प नाश पाऊन तो शस्त्र हातात घेईल हा प्रयत्न भगवंत करतात. पुढे आपल्या असंख्य अशा विभुती ज्याच्यामुळे हे जग व्यापून राहिले आहे,त्याचे निवेदन.कर्रुन ,सृष्टीचे आदी मध्य अंत मी आहे.असे योगोश्वर सांगतात. गीतेचा ११ वा अध्याय सर्वश्रेष्ढ मानल्या जातो.भगवंतानी आपले दिव्य विश्वरूप दर्शन अर्जुनाला घडवले.अर्जुनाची ज्ञान संपादन करण्याची जिज्ञासा बघुन आनंदीत झालेले भगवंत त्याला विष्वरुप दर्शन देतात.हे दर्शन अनेक प्रकारच्या अलंकारानी शोभत होते.या विश्वरुपात सर्व जग अर्जुनानी पाहिले.पण भगवंताचे अक्राळविक्राळ ,अतिभयंकर रुप अर्जुन फार काळ बघु शकला नाही.अर्जुन बघतो,रणांगणातील सेना समुदाय श्रीकृष्ण गिळून टाकत आहेत.भयभीत झालेला अर्जुन श्रीकृष्णाला सौम्य रुप धारण करण्यासाठी विनंती करतो.भगवंत म्हणतात हेच माझे खरे रुप आहे.हे पार्था तु निमित्त मात्र होऊन युध्य कर.आपापल्या कर्मानुसार ते आधीच मरण प्राप्त झाले आहेत. योगेशवर सांगतात,शुध्द ज्ञानानी जे माझ्याशी एकरूप होतात त्यांना पुर्नजन्म नाही.सत्व रज तम या गुणाचे आधिक्य वाढले की जीवाकडुन तशी कर्म घडतात.मुखात ब्रम्हनामाचा जप.,हाताने सात्विक कर्म ,पण विनीयोगाचे तंत्र माहीत नाही ते कर्म निष्फळ ठरते.भगवंताच्या सहज स्वरुप स्तिथीला भक्ती हे नाव आहे.जो माझा नाही तो माझी भक्ती करतो हे कसे कळेल.जो स्वत: आकाश झाला नाही. त्याला आकाशाची व्याप्ती कुठून कळणार. भगवंत म्हणतात, हे अर्जुना तुझ्यसारख्या क्षात्र धर्म स्वभाव ,शौर्यवान तुझ्याकडुन युध्य करवेलच.हरप्रकारे आत्मज्ञानाचा उपदेश करुन श्रीकृष्णानी अर्जुनाला युध्यासाठी प्रवृत्त केले .ते म्हणतात तुझे चित्त माझ्याठायी स्थिर कर आणी युध्य कर। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ,गीता श्रवणानी सुध्या मोहाची निवृती.व ज्ञानाची प्राप्ती होते.ही गीतारुपी आकाशातील अमृत वृष्टीच आहे.निवृतीनाथाच्या कृपादृष्टीने मी गीतेवर अलौकिक टीका केली.आणी ग्रंथ पुर्ण केला.भगवंत म्हणतात,आत्मस्वरुप प्राप्त झाले की,कर्म हीच पुजा,जी कल्पना केल्या जाईल तोच जप,ज्या स्तिथीत असेल तिच समाधी,व तो जे पाहील तिथे माझे दर्शन,जिथे पाय वळतील ते तीर्थस्थान ठरेल. धन्य ती माऊली ।धन्य ते योगेश्वर। दोघांनाही माझा शतश: प्रणाम। मधुरा पारखे

16You, Priyanka Parkhe, Anupama Moghe and 13 others16 CommentsLikeComment

श्रीकृष्णार्जुन संवाद …। (भाग २)मागील भागांत उल्लेख केल्याप्रमाणे गीताशास्त्र ज्ञानप्रधान असुन मोक्ष प्राप्तीसाठी स्वतंत्र,सामर्थ्य वान ग्रंथ आहे.योगेश्वर म्हणतात,ज्ञान हे काही दूर नाही.ते ज्याचे त्याच्याजवळच असते.ते त्याचे स्वरुपच आहे.पण नाशिवंत विषयाच्या आवडीमुळे आपल्या ठीकाणच्या ज्ञानास तो विसरतो.जीव आपल्या स्वरुपाला विसरतो,त्या स्तिथीला अज्ञान म्हणतात.अज्ञानाचा अंगीकार करुन बाहेर पडलेली अंत:करणवृती विस्तार पाऊन सत्व ,रज,तम या गुणांची वृध्दी होते.भगवंत म्हणतात, हे भारता सत्व गुण सुखाच्या ठीकाणी,रजो गुण कर्माच्या ठीकाणी आसक्तीचा उत्पन्न करतो,आणी तमोगुण तर ज्ञानाला झाकुन प्रमादाच्या ठीकाणी आसक्ती ऊत्पन्न करतो.तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहाच्या मागेपुढे करीत असतात.सत्व गुणाच्या वाढीमुळे सर्व इद्रीयात ज्ञानांचा प्रकाश पडतो.आणी मी ज्ञानी आहे असा त्याला गर्व होत नाही रजोगुणात जीवाला रजंविणारी कला आहे. अभिलाषा आणी आसक्ती याच्यापासुन उत्पन्न होतात.वारा जसा क्षणभर विश्रांती घेत नाही.तसा रजोगुणी पुरुष सतत काम करतो.आणी तमोगुण अज्ञानापासुन उत्पन्न होतो. प्रमाद आळस आणी निद्रा या तीन पाशांनी तो प्राण्याला बध्य करतो. या देहामध्ये सर्व ईद्रीयाच्या ठीकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान उत्पन्न होते.त्यावेळेस सत्व गुणाची वृध्दी झाली असे म्हणतात.हे भरतश्रेष्ठा रजोगुण अधिक झाला असता लोभी वृती ,दुर्धर अभिलाषा,विषयाची लालसा बळावते तमाची वृध्दी झाली तर प्रमाद मोह अविवेक , अप्रवृती निर्माण होते.सात्विक कर्माचे फळ निर्मळ असते.राजस क्रमाचे फळ दु:ख,आणी तामस कर्माचे फळ अज्ञान असते. आपल्या सर्व कर्माना हे गुणच कारणीभूत आहेत.चित्तावरील रजोगुण ,तमोगुण,हे सात्विगुणाने नाहीसे होतात.तसे परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचा काळेपणा ,गंज जातो. म्हणुनच हे पार्था सत्वगुणांनी युक्त कर्म कर.। भगवंत म्हणतात,हे अर्जुना ज्यानी ईद्रीय निग्रह करुन मनाची एकाग्रता साधली आहे ते रात्रदिवस माझी भक्ती करतात.सगुण भक्तांवर माझी प्राप्ती होण्यास फार कष्ट पडत नाही.सगुण भक्ती करणाऱ्याने माझी अनन्य भावे भक्ती केली तर त्याच्या सर्व योगक्षेमाचा भार मी घेतो.तो मला अत्यन्त प्रिय आहे. हे कौतेया,मन आणी बुध्दी माझ्या स्वरुपाच्या ठीकाणी स्थिर नांदु लागली तर तु आणी मी हा भेद उरेल का? तिकडे मन ,बुध्दी जातात तिकडे त्याच्या बरोबर अहंकार जातो. म्हणुनच हे अर्जुना मन बुध्दी स्थिर कर. ज्ञान, घ्या भजन पुजनादी कर्मानी सुध्या माझी प्राप्ती होइल. अभ्यासाहुन ज्ञान गहन आहे.ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ ,ज्ञानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ ,कर्मफल त्यागाहुन शांती सर्वश्रेष्ठ आहे.अर्जुना ही भक्ती मार्गातील चढती परंपरा आहे.याचं क्रमाने शांतीच ठाव गाठतां येतो.ब्रम्हानंदापर्यन्त पोहोचतां येते.लोकांना ज्यांचा कंटाळा येत नाही.व लोकांचा जो कंटाळा करत नाही. आनंद ,क्रोध, भय,उद्वेग याच्या पासुन जो अलिप्त आहे. तोच भक्त मला प्रिय आहे.चित्तवृती सतत ब्रम्हानंदात लीन झाल्यामुळे कोणत्याही दु:खद प्रसंगाचा अथवा मानहानीचा अनुभव अशा व्यक्तीना येत नाही.द्वेष शोक खंत शुभाशुभ गोष्टींचा त्याने त्याग केला असा भक्तीभाव पुरुष मला प्रिय आहे.ज्याच्या ठीकाणी भेदभावाची गोष्ट नाही .घरच्यान साठी उजेड परक्यान साठी अंधार असा भेदभाव दिवा जाणत नाही.त्याप्रमाणे त्याची वृती असते. म्हणुनच अशी भक्ती कर आणी स्थिर हो.।स्थीरवृती योग्यतेला प्राप्त होते.वरील भक्तीच्या लक्षणा्नी जो युक्त तो मला प्रिय आहे.त्याचे मी नेहमी कल्याणच करतो.हे अर्जुना तु माझा प्रेमळ भक्त.श्रोता आहेस.म्हणुन ओघानेच तुला अनेक गोष्टी समजाउन सांगितल्या। धन्य ती माऊली। धन्य ते योगेश्वर। मधुरा पारखे