Ram Navami Utsav. Article by Madhura Parkhe


।।श्री।। ।चराचरातील राम।“ राम जन्मला ग सखे राम जन्मला” एक नुसते डोळ्यांसमोर दृश्य उभे करा .अयोध्या नगरीत प्रभुरामचंन्द्राचा जन्म झालेला आहे, किती सुंदर आनंदोत्सव साजरा झाला असेल.संपुर्ण नगरी आनंदानी दुमदुमून निघाली असेल.आकाशातून देवलोकांनी पुष्प वर्षाव केला असेल.विष्णुचे ६वा अवतार प्रभुरामचंनन्द्र जन्माला आले.हेतुपुरस्सर झालेला हा जन्म, या मनुष्यजन्मात असुरांचा संहार करायचा होता. सर्वांच्या मनांत रुजलेली रामकथा तिची गोडी अपुर्व आहे. बाललीला करत मोठे झालेले ,किशोर वयातील रामलक्ष्मण वशिष्ट रुषीच्या बरोबर पृथ्विला राक्षसरहीत करण्यासाठी बाहेर पडतात.वशिष्ट रुषी दशरथ राज्यांना विनंती करतात,” जेष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा” या गीत रामायणातील गीतात किती माधुर्य आहे.सुंदर अशी विनवणी आहे.यज्ञ सुरु असतांना त्रस्त करणाऱ्या असुरांचा वध प्रभुरामचंन्द्र करतात.पुढे मिथीला नगरीत सीता स्वयंवरासाठी जातात.त्रीपुरारी महादेवाचे धनुष्य जो कोणी तोडेल त्याला जानकी वरमाला घालणार, हा जनक राजांचा प्रण प्रभुच्या हातुन पुर्ण होतो.”आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे.!”परत एकदा अयोध्या नगरी मोहुन निघते.सीतादेवींना बरोबर घेऊन अयोध्येला परत आलेल्या रामांना , राज्याभिषेक होणार असतो. पण नियतीने काही वेगळेच ठरवले असते.हे सुध्या हेतुपुरस्सर च! राणी कैकयीच्या हट्टामुळे प्रभुराम चौदा वर्ष वनवासात जातात.बरोबर लक्ष्मण , सीतामाई असतेच.तर अयोध्येत राजा दशरथ पुत्र वियोगाने निधन पावतात .भरत आपल्या आईची पापीणी म्हणुन निर्भत्सना करतो.। वनवासात प्रभुंना भिल्ल, कोळ,वनवासीवानप्रस्थ,ब्रम्हचारी,संन्यासी भेटतात.हे सगळेच राम भेटीमुळे परमपदाचे अधिकारी होतात.मुक्त पावतात.. निषध राज गुंह सारखा सखा त्यांना भेटतो.तेा त्यांना गंगा पार करायला मदत करतो.“नकोस नौके परत फिरु ग , नकोस नौके उर भरु,श्रीरामाचे नाम गात या श्री रामाला पार करु।जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी” या ग.दी.माडगुळकरांच्या अप्रतीम अशा गीताने डोळ्यांसमोर गंगा पार करण्याचे दृश्य उभे रहाते.मुनी वेषातले राम सीता लक्ष्मण मार्गस्थ होतात.वनवासात रहात असणारे अगस्थी रुषी,वाल्मिकी रुषी,अत्रीरुषी, अनुसुयादेवी यांची भेट होते.प्रभुंच्या आगमनाने संपुर्ण अरण्य पावन होते.सगळे रुषी प्रसन्न होतात. वाल्मिकी रुषींना प्रभु विचारतां त ‘हे मुनीश्रेष्ट, काही दिवस वस्ती करता येइल असे स्थान मला सांगा। वाल्मिकी रुषी म्हणतात,हे सर्वव्यापी,सर्वज्ञाता तुम्ही मला विचारतां मी कुठे राहु? हे सगळे विश्वच तर तुमचे आहे.प्रभु तुम्ही स्वत: वेद मर्यादारक्षक जगदीश्वर आहात.जिथे तुम्ही नाही असे स्थानच नाही. तरी पण तुम्ही विचारतां म्हणुन सांगतो.”जिथे तुमची कथा ऐकुन कान अतृप्त असतात, त्याचे नेत्र चातक पक्षासारखी तुमच्या दर्शनाला वाट बघतात,आपल्या सच्चीदानंदी स्वरुपाचे सुक्ष्म तरी दर्शन घडावे या लालसेने अधिर झालेले,नित्य तुमचे स्मरण केल्या जाते अशा ठीकाणी ,श्रध्यानी तुमच्याशी एकरूप झालेले आहेत,जिथे रामनामाचा जप होतो,केलेल्या कर्माचे फळ म्हणुन अखंड श्रीरामाच्या चरणी सेवा घडो हे मागीतल्या जाते,ज्या मनांत काम,मोह,मत्सर,क्षोभ,द्वेष,कपट नाही अशांच्या ह्यदयांत तुम्ही वस्ती करा।ज्याच्या मनांत तुमच्या बद्दल सहज स्वाभाविक असे प्रेम आहे,त्या ठीकाणी तुम्ही निरंतर वस्ती करा ।प्रभु पुढे वाल्मिकीरुषी च्या सांगण्यावरून चित्रकुट पर्वतावर निवास करतात.त्या पर्वतावर निवास करत असलेले अत्रीर्रुषी प्रभुनां ह्यदयलिंगन देऊन स्वागत करतात.अनुसुया माता सीताला कधीही मलीन न होणारे वस्र प्रदान करतातं. जिथे जिथे प्रभु जातात ती भुमी,चराचर सृष्टी पावन होते. इकडे भरत आपल्या प्रभुच्या वियोगाने शोकाकुल होतात.प्रभुरामचंन्द्राना परत आणण्यासाठी प्रचंड सेना, सर्व मातासहीत,वशिष्ट ,विश्वामित्र मुनींना बरोबर घेऊन अरण्यात जातात .रघुनाथांचे अहोरात्र स्मरण करीत त्याचा शोध घेतात.पण प्रभु पिताश्रीच्या आज्ञेनुसार मला वनवासात रहावे लागेल असे सांगुन भरताला परत पाठवतात.भरत रामाच्या पादुका बरोबर घेऊन अयोध्येस राजसिंहासनावर स्थापित करतो.व स्वत: नंदीग्राम मध्ये पर्णकुटीत राहुन अयोध्येचा राज्य कारभार सांभाळतो.भरताचा सेवाधर्म वाखाण्यासारखा आहे. विविध सृष्टी सौदर्याच्या सानिध्यात व मार्गात येणाऱ्या राक्षसांचा वध करत पुढे जात असतात.खर -दुषण सारख्या दैत्यांचा वध होतोअगस्ती रुषीचां शिष्य सुतीक्ष्ण ला प्रगाढ भक्ती,वैराग्य,समस्त ज्ञान,गुणशील राहशील असा वरदान देतात.दंडकारण्यात असलेल्या पंचवटीला पवित्र करतात.गोदावरीसमीप पर्णकुटीत राहु लागतात.सर्व रुषीमुनीना भागवत धर्मात प्रेम उत्पन्न होईल अशा कथा सांगतात. अहील्याला गैातम रुषीच्या शापातुन मुक्त करतात.”अहील्या शिळा राघवे मुक्त केली पती लागता दिव्य होऊन गेली.लक्ष्मणाला विविध सुखकारी गोष्टी सांगुन, कर्म वचन मनानी जे माझी भक्ती करेल त्या ठीकाणी मी सदा निवास करतो.,असा उपदेश करतात.लक्ष्मण दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टी ऐकुन सुखकारी होतो.दैत्य रावणाची बहीण शुर्पणखाला कान नाक करुन पाठवतो.तिला बघुन क्रोधीत झालेला रावण मारीचच्या सहाय्याने सीताहरण करतो. सीता वियोगाने दु:खी झालेल्या प्रभुंना पुढे सुग्रीव,हनुमान,बाली पुत्र अंगद आणी हजारोनी वानर सेना भेटते. त्रीकुट पर्वतावर लंकाधीश रावण रहात असतो. सेतु बांधारे सागरी म्हणत सागरावर सेतु बांधल्या जातो. तो पार करुन लंकेत घनघोर युध्य होते.युध्य भुमीवर राम लक्ष्मण योध्या म्हणुन सुशोभित होतात.सर्व देवतांना त्रस्त केलेल्या रावणाचा व त्याच्या परीवाराचा वध होतो.देवलोकांतुन पुष्प वर्षाव होतो.श्रीरामांना विमुख झालेला कधीही सुखी होत नाही.पुढे लंकेचा राजा झालेल्या विभीषणनी पुष्पक विमानातुन राम लक्ष्मण सीताला अयोध्या नगरीत पोहोचवतो.परत एकदा अयोध्या नगरी हर्षानी, आनंदानी न्हाऊन निघते.कौशल्या माता श्रीरामाच्या वाटेकडे डोळे लावून बसली असते.“पाऊले रामाची वाजली , आसवे आईची हासली” पुत्रभेटीने माता तृप्त होते. त्रिभुवनचे स्वामी श्रीरामचंन्द्राना राज्याभिषेक होतो.प्रजेसाठी राजा होता.सामान्य मनुष्याप्रमाणे राहुन अनेक लिला केल्या.प्रभुच्या भक्ती शिवाय त्यांच्या प्रभुतेची जाण होत नाही.विश्वास होत नाही.विश्वास नाही तर प्रीती नाही.आणी प्रीती नाही तर भक्ती नाही.”जे जे मंगल तेथे राम।” हा सिधांन्त सतत डोळ्यांसमोर ठेऊन कर्म करणे. प्रभुरामचंन्द्राच्या चरणी ही रसपुर्ण कथा अर्पण। मधुरा पारखे