Article courtesy Mrs Madhura Parkhe


ओम् नमो भागवते वासुदेवाय:।
कालच अधिक मास संपला.या अधिक मासात भागवत वाचन केले.खुप आवडले.जेवढे पवित्र कार्य या महिन्यात करता येईल तेवढे करावे.,असे भागवत धर्मात सांगितल्या जाते.प्रामुख्याने विष्णुची उपासना ।
१८ हजार श्लोकांचा हा ग्रंन्थ ,१२ स्कंदामध्ये विभाजित आहे. परमतत्वाचे अनुभवात्मक ज्ञान आणि त्याच्या प्राप्ती चे साधन ह्याचे स्पष्ट निर्देश भागवतात ग्रंथीत आहे.अत्यंन्त गोपनीय ब्रम्हतत्वाचे वर्णन त्यात आहे.
विश्वव्यापक नारायणाने ही सृष्टिची उत्पती केली।ती कशी केली? ५ ज्ञानेन्द्रीय,५कर्मेन्दीय, १मन ,५महाभूत,३गुण , हे तत्व समोर ठेऊन शरीराची निर्मिती केली।स्वर्ग ,पृथ्वी ,पाताळ या तीन स्तरांवर सृष्टीची विभागणी ,त्याचबरोबर संपुर्ण निसर्ग निर्मिती,प्रथम मनु ,त्याची पत्नी शतरुपा त्यांची मुंल,त्रुषीमुनी,गंर्धव,अप्सरा,देवता,राजे राक्षस,अशी ही प्रचंड उत्पती एकट्या नारायणानी केली.किती प्रचंड बुध्दीमता होती त्यामागे परमेश्वाची हे लक्षात येते. स्वत:च्या नाभीतुन कमलरुपी ब्रम्हाची उत्पती केली. हे सर्व या ग्रन्थात समाविष्ट आहे.
प्रत्येक स्कंदामध्ये राजर्षि परिक्षितला योगेन्द्र शुकदेव व देवर्षि नारदमुनीनी त्याच्या शंकाकुशंकाचे निरसन केलेले आहे. विविध प्रकारे सृष्टीत झालेल्या घडामोडी यांचे सविस्तर वर्णन यांत आहे.नारायणानी घेतलेले लहानमोठे २० अवतार ,प्रत्येक अवतारात परमेश्वराच्या हातुन घडलेले कार्य ,अनेक त्रुषीमुनी ,त्यांची योगशक्ती, त्यांनी दिलेले शाप ,त्या शापाला सामोरे गेलेल्या व्यक्ती यांचे सुंदर वर्णन आहे.स्वत: परमेश्वर सुध्दा श्रीकृष्ण अवतारात अशाच शापाच्या जाळ्यात अडकले,आणि त्यांच्या यदुकुलाचा नाश झाला.
दशम स्कंदामध्ये श्रीकृष्ण लिला सविस्तर वर्णित आहे.राक्षशीण पुतना वध ही लिला सांगाविशी वाटते.पुतनाचा मुंल मारण हा व्यवसाय कंसाच्या सांगण्यावरून ती श्रीकृष्णाला मारायला येते.स्तनपाना साठी भगवंताला मांडीवर घेते.खंर बघायला गेले तर पुतना भाग्यवान च ।विश्वविधाता नारायण तिच्या मांडीवर असतो.तिचे प्राण भगवंतानी शोषून घेतले आणि तिला भगवंताच्या हातुन मृत्यु येतो.
तसेच जरासंघा सारखा शत्रु२८ वेळा द्वारकेवर चाल करुन येतो. प्रत्येक वेळेस करोडोंनी आणलेल्या त्याच्या सैन्याचा भगवंत निप्पात करतात. असे २८ वेळा होते. देवर्षी नारद परिक्षीतला सांगतात,भगवान प्रत्येक वेळेस पृथ्वीचा भार हलका करतात.भगवंत सांगतात अर्धमाची वृध्दी जिथे जिथे होणार,तिथे पृथ्वीचा भार वाढणार,तो भार मला हलका करावाच लागतो. भारतीय युध्द कौरव पाडंवांचे घडुन आले,घडवल्या गेले.ते सुध्दा भूभार हलका करण्यासाठी। हा सृष्टीचा नियमच आहे.
अर्धमाच्या आहारी जाऊन,मायेच्या मोहपाशात मनुष्य अडकतो.,तिथून त्याला बाहेर पडायलाच पाहिजे.हे वारंवार भागवतात सांगितल्या जाते.भगवंताच्या स्वरुपाची निरंतर श्रध्येनी केलेली भक्ती भजन यामुळे मनुष्य मायेपासुन निवृत होतो.बुद्धीमध्ये वारंवार कपट दम्भ व्याप्त होतात, हीच माया।
आपल्या हातुन होणारे प्रत्येक काम याला साक्षीदार ईश्वर असतो.म्हणून कार्य असे करायचे,जिथे ईश्वर मनापासुन खुष होईल. कार्य करता करता परमेश्वराची अविचलीत भक्ती सदासर्वदा करा ,आणी मोक्ष मिळवीण्याची वाटचाल करा,हेच भागवत सांगते.
समस्त प्राण्यांचा आत्मा भगवान विष्णु आहे.मानवी शरीरात स्थित आत्म्याने पुजन करा.आत्मा अलिप्त आहे.सगळे विकार शरीराचे असतात. त्या विकारांना वाजवीपेक्षा जास्त महत्व देऊ नये.
भगवंतानी या सृष्टीसाठी तीन संकल्प पुरुष प्रकट केले.रजोगुण प्रधानत्तेसाठी ब्रम्हां, सत्वगुण

प्रधानतेसाठी विष्णु आणि तमोगुण प्रधानतेसाठी रुद्र यांना अधिकार प्रदान केले.,त्यानुसार ते कार्यरत राहिले.,राहतील.
विश्वविधाता परमेश्वराला नमस्कार. ।
सौ मधुरा पारखे

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.